32 C
Mumbai
Sunday, April 13, 2025
घरविशेषहिरवी मूग डाळ प्रथिनांचा खजाना

हिरवी मूग डाळ प्रथिनांचा खजाना

शाकाहाऱ्यांसाठी आयुर्वेद तज्ञांचा सल्ला

Google News Follow

Related

हिरवी मूग डाळ म्हणजे शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना. हिरव्या मूग डाळीच्या सेवनाने प्रथिनांच्या कमतरतेवर मात करता येते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, या डाळीत चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रथिने असतात. प्रथिनांनी भरपूर असलेली ही डाळ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला तंदुरुस्त ठेवते. हिरव्या मूग डाळीचे पौष्टिक मूल्य आणि त्यातील पोषक घटकांबाबत माहिती देताना, पंजाबच्या बाबे के आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे बीएएमएस, एमडी डॉक्टर प्रमोद आनंद तिवारी म्हणाले की, हिरवी मूग डाळ आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आहारात समाविष्ट करायला हवी. या डाळीत मांसाहारापेक्षाही जास्त प्रथिने असतात.

डॉ. तिवारी सांगतात, “मूग डाळ खाल्ल्याने स्नायू आणि हाडे बळकट होतात. या डाळीत मुबलक प्रमाणात प्रथिने तसेच फायबर, लोह (आयरन), मॅग्नेशियम, जीवनसत्त्व बी, बी6, फोलेट, तांबे (कॉपर), झिंक आणि पोटॅशियम असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.”

हेही वाचा..

पीपीएफ खात्यात वारस अपडेटसाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत

भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी

बांगलादेशात हिंसाचाराचा भडका

बँकॉकमधील स्वागताने पंतप्रधान मोदी भारावले

त्यांनी पुढे सांगितले, “हिरव्या मूग डाळीच्या सेवनाने पेशींच्या (टिशू) दुरुस्तीस मदत होते. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्थेस मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची (कब्ज) समस्या असेल, तर मूग डाळ ही समस्या दूर करू शकते. ही डाळ लवकर पचते, तर मटण आणि चिकन पचायला जास्त वेळ लागतो.”

आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे की, हिरव्या मूग डाळीच्या सेवनाने अनेक समस्यांवर मात करता येते. ही डाळ फक्त बद्धकोष्ठतेपासूनच मुक्ती देत नाही, तर हृदयासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल पातळी वाढू देत नाहीत, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. याचे सेवन करणे अतिशय सोपे आहे. ही डाळ न्याहारीत घेतली जाऊ शकते तसेच दैनंदिन आहारात समाविष्ट केली जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा