कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्क्यांमधील घरांवर उड्या

कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्क्यांमधील घरांवर उड्या

म्हाडामध्ये घर लागावे हे मध्यमवर्गाचे स्वप्न असते. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत एक लाख ८२ हजार ५२३ इच्छुकांनी नोंदणी केली. तर दोन लाख ७८ हजार २२६ जणांनी अर्ज भरले असून यातील दोन लाख ४६ हजार ६५ जणांनी अनामत रक्कमेसह बँकेकडे अर्ज दाखल केलेली आहे.

या सोडतीमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८९८४ घरांसाठीच्या सोडतीमध्ये सर्वाधिक पसंती २० टक्क्यांमधील घरांना मिळालेली आहे. खासगी विकासकांकडून मिळालेल्या घरांना अर्जदारांनी अधिक पसंती दिलेली असून, २० टक्क्यांतील ८१२ घरांसाठी एकूण अर्जाच्या ८४ टक्के अर्थात दोन लाख सात हजार १८० अर्ज सादर झाले आहेत.

एकीकडे हे चित्र असताना सोडतीमध्ये असणारी पंतप्रधान योजनेतील घरांसाठी ११ हजार २८५ अर्ज प्राप्त झालेले आहेत. कोकण मंडळाला २० टक्के योजनेअंतर्गत ठाण्यात पहिल्यांदाच खासगी विकासकांकडून म्हाडाच्या हिश्शातील घरे मिळाली आहेत. ८१२ घरांची संख्या असून या घरांची निर्मिती ही खासगी विकासकांनी केलेली आहे. तसेच याची किमत तुलनेने कमी आहे. त्यामुळे या घरांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. केवळ ८१२ घरे असताना त्यासाठी तब्बल दोन लाख सात हजार २०८ अर्ज आले आहेत.

 

हे ही वाचा:

श्रीनगरमधील हिंदू, शीख हत्यांनंतर अमित शहांनी उचलले मोठे पाऊल

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

राम रहीम दोषी; सीबीआय न्यायालय सुनावणार १२ ऑक्टोबरला शिक्षा

उष्णता वाढलेल्या शहरांच्या यादीत भारताच्या ‘ही’ शहरे पहिल्या दहांत

 

म्हाडाकडून नुकतेच जाहीर झालेल्या यादीनुसार दोन लाख ४६ हजार अर्ज आलेले आहेत. कोकण मंडळाकडून विरार-बोळिंज आणि मीरा रोड येथे मोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. या गृहप्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या प्रकल्पातील १,९९२ घरे सोडतीत समाविष्ट असून याकरता २८ हजार १९७ अर्ज दाखल झालेले आहेत. तसेच कल्याणमधील खोणी आणि शिरढोण तसेच भंडार्ली येथे पंतप्रधान योजनेंतर्गत घरे बांधली जात आहेत

Exit mobile version