पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

स्वागतासाठी सजवला ४५ किमी लांबीचा रस्ता

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

‘नेबर फर्स्ट’ धोरणांतर्गत पंतप्रधान मोदी शुक्रवारी(२२ मार्च) भूतानला पोहचले.पंतप्रधान मोदींचे पारो विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावरच स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पारो विमानतळ ते देशाची राजधानी थिंपूपर्यंतचा संपूर्ण ४५ किमीचा रस्ता सजवण्यात आला होता.भूतानचे लोक पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिले आणि मोदी ज्याठिकाणी गेले तिकडे मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर भूतानला पोहोचले आहेत.पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांना पाहून असे वाटले की संपूर्ण भूतान रस्त्यावर उतरला होता.पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण ४५ किमीचा रस्ता सजवण्यात आला होता.

हे ही वाचा:

केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!

जसे कर्म तसे फळ…. कुमार विश्वास यांचा केजरीवाल यांना टोला

बिहार: कोसी नदीवरील निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला, एकाचा मृत्यू!

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत होताच भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी स्वागत केले.पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी ट्विटकरत लिहिले की, ”माझे मोठे भाऊ, तुमचे भूतानमध्ये स्वागत आहे”.भूतानला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनीही ट्विट केले होते.त्यांनी लिहिले की, ‘मी भूतानला जात आहे, जिथे मी भूतान आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी देशातील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. मी भूतानचा राजा, भूतानचा चौथा राजा आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे यांना भेटण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.

भूतानमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी भूतानच्या लोकांना अभिवादन केले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. भूतानच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारत-भूतान द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्याचे काम करतील. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Exit mobile version