महायुतीचे उमेदवार नवाब मलिक, पण भाजप प्रचार करणार नाही!

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य

महायुतीचे उमेदवार नवाब मलिक, पण भाजप प्रचार करणार नाही!

विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर केली आणि आज नवाब मालिकांनी उमेदवारीचा अर्ज देखील भरला. मात्र, नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून विरोधक भाजपवर टीका करत आहेत. विरोधकांच्या टीकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युतर दते पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही’, असे आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा : 

लबाडाघरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही !

ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची विद्यापीठ स्पर्धात भरारी

दिल्ली वक्फ बोर्डाने वक्फ कायद्यातील बदलांना पाठींबा दिल्यानंतर जेपीसी बैठकीत गोंधळ

प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

सना मलिकांचे काय?
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

Exit mobile version