संसद भवन उद्घाटनासाठी ७५ रुपयांचे खास नाणे !

अनेक मिश्रधातूंपासून बनवल्यामुळे नाण्याची आहे खासियत

संसद भवन उद्घाटनासाठी ७५ रुपयांचे खास नाणे !

२८ मे रोजी संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे.केंद्र सरकार २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उदघाटन होणार आहे, या उद्घाटनासाठी ७५ रुपयांचे विशेष नाण्याचे अनावरण करणार असल्याचे, वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

वित्त मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनुसार हे नाणे ४४ मिलिमीटर व्यासासह एक गोलाकार आकार असेल आणि ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल, ५ टक्के जस्त – चतुर्थांश मिश्रधातूपासून बनविलेले असेल. नाण्याची खासियत अशी आहे, नाण्याच्या मुखावर मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह असतील. खाली ‘सत्यमेव जयते’ कोरलेले असेल. देवनागरी लिपीतील ‘भारत’ शब्दासह डाव्या बाजूस आणि उजव्या परिघावर ” इंग्लिशमध्ये INDIA,” अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, नाण्याची उलट बाजू संसदेच्या संकुलाची प्रतिमा दर्शवेल. ‘संसद संकुल’ हे शब्द देवनागरी लिपीत तर नाण्याच्या खालच्या परिघावर ‘संसद संकुल’ असे इंग्रजीत लिहिलेले असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणे काढले जात आहे.

हे ही वाचा:

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांना दिली ‘सेंगोल’ची कल्पना

असा असेल संसद भवन उदघाटन कार्यक्रम; पूजा, सेंगोल प्रतिष्ठापना, पंतप्रधानांचे संबोधन

नवीन संसद भवनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नवीन संसद भवनाबाबत देशात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांचा असा युक्तिवाद आहे की नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे, पंतप्रधानांनी नाही.

विरोधकांच्या निर्णयाबद्दल विचारले असता, गृहमंत्री अमित शहा म्हणाले की सरकारने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे आणि ते त्यांच्या शहाणपणानुसार प्रतिसाद देतील.पुढे म्हणाले, भारत सरकारने सर्वांनी उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे वागेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत बहिष्काराच्या आवाहनाबाबत विचारले असता सांगितले.संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांचे हे पाऊल दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असे आवाहन केले. बहिष्कार टाकणे आणि गैर समस्यामधून मुद्दा बनवणे हे सर्वात दुर्दैवी आहे. मी त्यांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे जोशी म्हणाले.

Exit mobile version