24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'राज्य मासा' असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

‘राज्य मासा’ असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

वने व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

Google News Follow

Related

पापलेट हा मासे खवय्यांचा सर्वात आवडता मासा. हा मासा स्वादिष्ट असून तो आरोग्याच्या विविध फायद्यांसाठी ओळखला जातो. पापलेट हा मासा वैशिष्ट्यपूर्ण निवडक प्रजातीचा असल्याने शाश्वततासंवर्धन आणि वाढीसाठी त्याला राज्य शासनाने ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केला आहे. जेणेकरून या माध्यमातून पापलेटचे जतन व संवर्धनसागरी पर्यावरणजीवसाखळी आणि मच्छिमारांची आर्थिक उपजीविका टिकवून ठेवता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही याला प्रोत्साहन दिले आहे. मासेमारी हा रोजगार देणारा व्यवसाय असून पर्ससिनएलईडी पद्धतीने मासेमारीबाबत कडक कारवाई करण्यात येत असल्याचे वनेसांस्कतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत म्हणाले.

आमदार रमेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील पापलेट माशाला विशिष्ट मानांकन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले कीमच्छिमारांना पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना आवश्यक असलेल्या मासेमारी साधनांच्या खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना शासनाकडून राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी मासेमारीचे जतनसंवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असून मासेमारी करण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आली नसल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

पापलेट जातीच्या लहान माश्यांच्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र २ नोव्हेंबर२०२३ अन्वये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत पापलेट माशाला वाणिज्यिकदृष्ट्या महत्वाच्या प्रजातीमध्ये समावेश करून १३५ टी. एल. इतके परिपक्वतेचे किमान आकारमान निश्चित करून त्यापेक्षा कमी आकाराचे पापलेट मासे पकडल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ व सुधारित कायदा २०२१ अन्वये नियंत्रण ठेवण्यासाठी शास्तीचे प्रयोजन ठेवले आहे.

हेही वाचा :

धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!

एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?

फडणवीस गरजले, चुकीला माफी नाही..

अदानी समूहाविरोधात उद्या ठाकरे गटाचा धारावीत मोर्चा!

सातपाटी येथील सिल्वर पापलेट माशाला महत्त्व अधोरेखित होण्यासाठी राज्य माशाचे संरक्षणसंवर्धन करण्यासाठी भौगोलिक संकेत व्हावे  या कारणाने या माशाची निर्यात करताना मदत होईल. डिझेल तेलावरील विक्रीवरची प्रतिपूर्ती ७० कोटींवरून १६१ कोटी रुपये वाढवले आहे.

मासेमारी धोरण निर्मितीसाठी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमली असून यामध्ये विधानसभाविधानपरिषदेचे सदस्य आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर मसुदा अंतिम केला जाईलअसे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा