राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनची ओळख आता कायमची पुसल्या गेली आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान केले आहे. आता हे उद्यान दरवर्षीप्रमाणे सामान्यांसाठीही खुले होणार आहे. ट्यूलिप आणि गुलाबाच्या विविध प्रजातींची फुले पाहण्यासाठी लोक येथे मोठ्या संख्येने येत असतात.
राष्ट्रपती भवन येथे असलेले अमृत उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. येथे ब्रिटीश आणि मुघल दोन्ही उद्यानांची झलक पाहायला मिळते. एडविन लुटियन्सने देशातील तसेच जगभरातील उद्यानाचा अभ्यास करून या उद्यानाची उभारणी केली. सामान्य लोक फेब्रुवारी ते मार्च या नियोजित दिवशीच येथे येऊ शकतात. यानंतर येथील गेट बंद होते. हे उद्यान जे आता ३१ मार्च रोजी खुले होणार असून ते दोन महिने खुले राहणार आहे. उद्यान उघडण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी असेल.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
असे खास आहे अमृत गार्डन
रायसीना हिल्समध्ये असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या आत १५ एकर जागेवर हे अमृत उद्यान आहे, ज्यामध्ये गुलाब, विविध फुले, सेंट्रल लॉन आणि लॉग, गोलाकार, अध्यात्मिक अशा १० पेक्षा जास्त बागा आहेत. याशिवाय सुमारे १६० जातींच्या पाच हजार झाडांचाही येथे समावेश आहे. याशिवाय येथे नक्षत्र उद्यान देखील आहे, बागेत विशेष प्रकारची १२ ट्युलिप फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. बागेत सेल्फी पॉइंटही आहेत, तसेच फूड कोर्टही येथे सुरू होणार आहे. क्यूआर कोडवरून लोकांना वनस्पतींच्या विविध प्रकारांची माहिती मिळू शकेल. उद्यानात १२० प्रकारचे गुलाब आणि ४० सुगंधी गुलाब आहेत.
याआधी रस्त्यांची नावे देखील बदलली
सरकारने अलीकडे नवी दिल्लीतील रस्त्यांची नावे देखील बदलली आहेत. या क्रमाने अनेक इमारती, संस्था आणि रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड, नियोजन आयोगाचे नीती आयोग, रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्यात आले आहे.