प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे!

नवी दिल्लीत रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे!

दिल्लीमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.या तरुणांना केंद्रापासून राज्यापर्यंत सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या तरुणांना विविध विभागात सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीच्या रायसीना रोडवर असलेल्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.

मंगळवारी आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत देशातील अनेक भागातील ५१ हजार युवकांना जॉईनिंग लेटर देण्यात आले. ४६ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या भरती व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीही भरती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे आता शिवसेनेत

काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!

शतकवीर श्रेयस अय्यर म्हणाला, मला एकटेपणाने ग्रासले होते!

कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

युवकांनी कठोर परिश्रमाने हे यश मिळवले असून या यशाला मोठे महत्त्व असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त उमेदवारांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, हे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्थाही वेगाने विकसित होत असून तरुणांसाठी अनेक मोठ्या संधी येतील.

पोस्ट विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये नवनियुक्त कर्मचारी भरती झाली आहे. या विभागात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.आजचा पार पडलेला रोजगार मेळावा हा नववा होता. तसेच २८ ऑगस्टपर्यंत आठ रोजगार मेळ्यांतर्गत ५.५ लाखांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत म्हणजेच २६ सप्टेंबरपर्यंत ६ लाखांहून अधिक तरुणांना जॉईनिंग लेटर देण्यात आले आहेत.

 

Exit mobile version