22 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरविशेषगॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता 'कोड'वर्ड

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

गॅस चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार

Google News Follow

Related

सिलिंडर घेताना ग्राहक त्यात एक ते दोन किलोपेक्षा कमी गॅस असल्याच्या तक्रारी अनेकदा घडतात. गॅस कमी झाल्यानंतर अनेक वेळा ग्राहक त्याबाबत तक्रारीही करतात. मात्र, ट्रेसिंगची चांगली यंत्रणा नसल्यामुळे गॅसची चोरी कोण करत आहे, हे कळत नाही. गॅस चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर गॅस चोरी करणे कठीण होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सरकार आता एलपीजी गॅस सिलिंडरसाठी क्यूआर प्रणाली आणत आहे. काळ्या बाजारला आला घालण्यासाठी सरकारने ही नवीन योजना जाहीर केली आहे.

पुढील तीन महिन्यांत सर्व घरगुती गॅस सिलिंडरमध्ये क्यूआर कोड असेल असे इंडियन ऑइल चे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी सांगितले. जागतिक एलपीजी सप्ताह २०२२ च्या निमित्ताने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, हा एक क्रांतिकारी बदल आहे कारण ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचा मागोवा घेता येणार आहे.  एखाद्या व्यक्तीने गॅस चोरी केली तर  परिस्थितीत क्यूआर कोड प्रणालीद्वारे त्याचे ट्रेसिंग अगदी सहजपणे केले जाऊ शकते.

त्यांनी सांगितले की क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण माहिती मिळू शकेल. उदाहरणार्थ, सिलेंडर कोठे रिफिल केले गेले आहे आणि सिलेंडरशी संबंधित कोणत्या सुरक्षा चाचण्या केल्या आहेत.क्युआर कोड सध्याच्या सिलेंडरवर लेबलद्वारे पेस्ट केला जाईल, तर तो नवीन सिलेंडरवर वेल्डिंग करून लावला जाईल असेही ते म्हणाले.

हे ही वाचा : 

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

युनिट कोड आधारित ट्रॅक अंतर्गत, क्यूआर कोड एम्बेड केलेले २०हजार एलपीजी सिलिंडर पहिल्या टप्प्यात जारी करण्यात आले. हा एक प्रकारचा बारकोड आहे, जो डिजिटल उपकरणाद्वारे वाचता येतो. पुरी म्हणाले की, पुढील तीन महिन्यांत सर्व १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये क्यूआर कोड बसवला जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा