शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्यासोबतच भारतीय लष्करातील महिलाही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. अलीकडच्या काळात भारताच्या सशस्त्र दलात महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. लष्करातील त्यांची भूमिका प्राधान्याने वाढवण्यासाठी सरकारही विविध प्रयत्न करत आहे. लष्करातील महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणे समान संधी आणि आव्हाने दिली जात आहेत. या क्रमाने प्रथमच पाच महिलांना अधिकाऱ्यांना तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
२९ एप्रिल रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे यशस्वी प्रशिक्षणानंतर पाच महिला अधिकारी रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये सामील झाल्या आहेत. या तरुण महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती करण्यात आली असून तेथे त्यांना रॉकेट,मीडियम ,फिल्ड आणि आव्हानात्मक परिस्तिथीत उपकरणे हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जाईल,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तीन उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि इतर दोन पश्चिमेकडील आव्हानात्मक ठिकाणी तैनात आहेत.
हे ही वाचा:
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
आर्टिलरी रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट मेहक सैनी ,एसएटीए रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट साक्षी दुबे आणि लेफ्टनंट अदिती यादव ,फिल्ड रेजिमेंटमध्ये पवित्रा मोदगील आई रॉकेट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट आकांशा यांचा समावेश आहे.या समारंभाला लेफ्टनंट जनरल अदोष कुमार,कर्नल कमांडंट आणि तोफखाना महासंचालक ,सोबत इत्तर मान्यवर नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिमानी कुटुंबीय यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.या वर्षी जानेवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता ,ज्याला नंतर सरकारने मान्यता दिली.
आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांचे कमिशनिंग हे भारतीय सैन्यात चालू असलेल्या परिवर्तनाची साक्ष आहे.नियुक्त झालेल्या महिला अधिकाऱ्यांची ही पहिलीच तुकडी आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिन्ही दलांमध्ये ९,११८ महिला आहेत. तथापि, केंद्र सरकार प्राधान्याच्या आधारावर दलातील त्यांची भूमिका वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. हे देखील कारण आहे की २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता महिला लढाऊ विमाने उडवणे, जहाजावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणे तसेच विशेष ऑपरेशनद्वारे शत्रूला धडा शिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.