शिंदे फडणवीस सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी शिंदे सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.
अनेक गोविंदा पथकांनी शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन गोविंदा पथकातील गोविंदांना आता १० लाखाचे विमा संरक्षण सरकारकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम सरकारकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
तसेच राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायत शेतीसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत. यापूर्वी १० हजार प्रती हेक्टर मिळत होते. बागायत शेतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी २५ हजार रुपयांवरून ती आता ३६ हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात २ हेक्टरवरून ३ हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी
रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी
शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.