26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषपाठीशी तीन भावंडे असलेला 'गोविंदा' झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित

पाठीशी तीन भावंडे असलेला ‘गोविंदा’ झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित

विमाही मिळणार नाही

Google News Follow

Related

विरारचा रहिवासी असलेल्या सूरज कदम याने यावेळी त्यांच्या तिन्ही भावंडांना वचन दिले होते की, यंदाच्या दहीहंडीतला आपला सहभाग हा शेवटचा असेल. मात्र, त्याच्या दैवाला वेगळीच कलाटणी दिली. ऑफिस बॉय म्हणून काम करणारा हा २५ वर्षीय गोविंदा गुरुवारी गोविंदाच्या दुसऱ्या थरावरून खाली पडला अन् त्याला जबर दुखापत झाली. त्याच्या कमरेखालच्या भागाला अर्धांगवायू झाला असून त्याला आता यापुढे कधीच चालता येणार नाही.

यंदा दहीहंडी उत्सवात एकूण १८५ गोविंदा जखमी झाले. अर्थात ही संख्या गेल्या वर्षीच्या जखमी गोविंदांपेक्षा (२२२) कमी असली तरी शुक्रवारी जवळपास २० गोविंदा रुग्णालयात होते. एका ३० वर्षीय गोविंदाला मणक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या घोटा आणि पायापर्यंतच्या संवेदना हरवल्या असल्यामुळे तो बरा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १७७ हून अधिक गोविंदांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले की, सूरजला पॅरापेरेसीसचा त्रास झाला, त्याच्या शरीराचा खालचा भाग शक्तिहीन झाला आणि त्याने मूत्राशय आणि आतड्यांवरील त्याचे नियंत्रण गमावले. सूरज आणि दुसऱ्या रुग्णावर शनिवारी डीकंप्रेशन शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. देसाई यांच्या मते, सूरजच्या मणक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालण्याची क्षमता पुन्हा प्राप्त होणार नाही. सूरजच्या छातीच्या स्नायूंनाही अर्धांगवायू झाल्यामुळे, त्याच्या श्वसनात गुंतागुंत होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे सूरजचे संपूर्ण कुटुंबच दु:खाच्या खाईत लोटले गेले आहे. ‘तो कदाचित पुन्हा चालणार नाही आणि त्याला दीर्घकाळ उपचाराची आवश्यकता असेल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. आम्हाला सर्वकाही कसे परवडेल, हे माहीत नाही,’ असे सूरजची २३ वर्षीय बहीण संपदा म्हणाली. संपदा आणि दुसरी बहीण या दोघी लहान भाऊ शाळेत असताना काम करतात. आणखी चिंताजनक बाब म्हणजे सूरज हा नोंदणीकृत दहीहंडी मंडळाचा भाग नसल्यामुळे, त्याला कोणताही वैद्यकीय विमा नाही. चार वर्षांपूर्वी या चौघा भावंडांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यापासून सूरजच कुटुंबाचा प्रमुख आहे.

हे ही वाचा:

बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दखल

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

शुक्रवारी दिवसभरात आणखी डझनभर रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी तिघांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन जणांना वांद्र्याच्या भाभा हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये आणि प्रत्येकी एकाला कांदिवलीच्या वीर सावरकर हॉस्पिटल आणि बीडीबीए हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा