आणखी एका गोविंदाचा मृत्यू; प्रथमेश सावंतने गमावले प्राण

मुख्यमंत्र्यांनी केली ५ लाखांची मदत जाहीर

आणखी एका गोविंदाचा मृत्यू; प्रथमेश सावंतने गमावले प्राण

दहीहंडीचा थर लावताना गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो केईएम रुग्णालयात मृत्युंशी झुंज देत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यूनं झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दहिहंडीमध्ये मृत्यू होणारा प्रथमेश हा दुसरा गोविंदा आहे.

करी रोडवरील साई भक्त क्रीडा मंडळ गोविंदा संघातील प्रथमेश सावंत हा थर लावताना गोविंदा खाली पडल्याने जखमी झाला आणि त्याला पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे कमरेच्या खालच्या भागात काही संवेदना उरलेल्या नव्हत्या. त्यासाठी ते केइएममध्ये उपचार घेत हेता. गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी लढा देत हेता. अखेर शनिवारी सकाळी त्याचा हा लढा संपला.

प्रथमेश सावंत हे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई.एम त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेत होता. प्रथमेश लहानपणापासून करी रोड येथील कामगार सदनच्या चाळीत राहत होता . त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला. या सर्व दुःखद घटनांनंतर, तो येथे आपल्या काका-काकूंसोबत राहिला आणि सोशल सर्व्हिस लीग स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. एमडी कॉलेजमध्ये बारावी पूर्ण केल्यानंतर तो सध्या आयआयटीचे शिक्षण घेत होता. घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणे हा त्याचा दिनक्रम होता. डिलिव्हरी बॉयचे काम करून अर्थार्जन करत होता. नातेवाईकच त्याची रुग्णालयात काळजी घेत होते.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० को

प्रथमेशच्या मृत्यूची बातमी कळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची अर्थिक मदत जाहीर केली. प्रथमेशला अपघात झाल्यानंतर या आधीही मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली होती.

Exit mobile version