महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा आज (१५ ऑक्टोबर) शपथ विधी सोहळा पार पडला. १२ पैकी ७ आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त विधानपरिषद आमदारांना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली.
गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी १२ आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज मुहुर्त मिळाला आणि १२ पैकी ७ राज्यपाल नियुक्त आमदारांनी शपथ घेतली. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपचे तीन, शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आहेत. यामध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इंद्रीस नायकवाडी यांना संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपी अख्तरला पकडले, यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा
मालाडमधील रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसे कार्यकर्ता दगावला
मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का?