सरकारची वसुली पालिकेपर्यंत झिरपतेय

सरकारची वसुली पालिकेपर्यंत झिरपतेय

काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला होता. यामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. मुंबईत देखील विविध ठिकाणी अनेक झाडे कोसळली. मात्र ती कोसळलेली झाडे उचलण्यासाठी किंवा त्यांच्या पडलेल्या फांद्या उचलून साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून शुल्क आकारणी केली जात असल्याचे कळले आहे. त्यावरून भाजपाने ट्वीटरच्या मार्फत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे.

चक्रीवादळात अनेक झाडे पडली होती. त्यापैकी काही झाडे ही सोसायट्यांच्या आवारातील देखील पडली होती. मात्र महानगरपालिकेकडून ही झाडे उचलण्यासाठी पैशांचा तगादा लावला जात आहे. ही झाडं उचलण्यासाठी पालिकेकडे आवश्यक ती यंत्रे आणि कर्मचारी नसल्याचे देखील समोर येत आहे. काही ठिकाणी तर नदी-नाल्यांतील पाणी सोसायट्यांमध्ये शिरल्याचे संतापजनक प्रकार देखील घडले होते.

हे ही वाचा:

ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा

भाजपा मुंबईच्या अधिकृत ट्वीटरवरून हे मुद्दे उचलण्यात आले आहे. भाजपाने यावरून महापालिकेला लक्ष्य केले आहे. राज्य सरकारची वसूली पालिकेपर्यंत झिरपली असल्याचा हल्लाबोल भाजपाकडून करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

नाकर्त्या बीएमसीमुळे नदी-नाल्यांचं पाणी सोसायट्यांमध्ये शिरलं. झाडांखाली चिरडून लोकं दगावली. ही झाडं उचलायला पालिकेकडे यंत्रेही नाहीत आणि कर्मचारीही. आता सोसायट्यांमधली झाडं उचलण्यासाठी पालिका पैशांचा तगादा लावतेय. सरकारची वसुली पालिकेपर्यंत झिरपतेय.

Exit mobile version