सध्या कोविडच्या काळात केंद्र सरकारकडून लसीकरण मोहिम अधिकाधीक वेगाने करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबतच केंद्र सरकारने शनिवारी सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात या वर्षाअखेरपर्यंत १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्वाळा दिला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींच्या खरेदीला केंद्र सरकारने सुरूवात देखील केली आहे.
देशातील लसीकरण मोहिम वेगाने चालू रहावी यासाठी केंद्र सरकारने ३१ जुलै पर्यंत ५१.६ कोटी लसींच्या मात्रा दिल्या जातील आणि पुढील काळासाठी १३५ कोटी लसींची तरतूद देखील केली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने यावेळी दिली आहे.
हे ही वाचा:
१२-१८ वयोगटातील मुलांना झायडस कॅडीलाची लस
कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका
आरबीआयच्या निर्णयाने ‘अर्थतज्ज्ञ’ राजकारणी अडचणीत
जम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार देशात १८ वर्षांवरील लोकसंख्या ९३ कोटी ते ९४ कोटींच्या आसपास असून, त्यांच्या लसीकरणासाठी देशाला अजून १८६-१८८ कोटी लस मात्रांची आवश्यकता आहे. सरकारने ५,८०३ कोटी रुपये खर्च करून ५१.६ कोटी लसमात्रा खरेदी करणार आहे.
यात दिलेल्या माहितीनुसार सरकारने १३५ कोटी लसींची तयारी केली आहे. त्यामध्ये कोविशिल्डच्या ५० कोटी, कोवॅक्सिनच्या ४० कोटी लसी, बायो ई ३० कोटी, झायडस कॅडिलाच्या ५ कोटी आणि स्पुतनिकच्या १० कोटी लसींचा समावेश आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार लसीकरण लवकरच पूर्ण होईल कारण अनेक लसी या चाचणींच्या शेवटच्या टप्प्यात असून त्यापैकी अनेकांना लवकरच वापरायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना लसींची खरेदी करण्यात सरकारला यश आल्यास लसीरण मोहिम लवकरच पूर्ण होईल सा विश्वास सरकारकडून व्यक्त केला गेला आहे.