रिक्षा टॅक्सी भाडेवाढीसाठी संपाचे हत्यार

रिक्षा-टॅक्सी चालक संपावर जाण्याची शक्यता.

रिक्षा टॅक्सी भाडेवाढीसाठी संपाचे हत्यार

मुंबईत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी लोकल, बेस्ट बस पाठोपाठ रिक्षा-टॅक्सीचा नंबर लागतो. मात्र हातावर पोट असणाऱ्या या चालकांची वाढत्या इंधनवाढीमुळे फरफट होत आहे, रिक्षा-टॅक्सी चालकांनी १ ऑगस्ट रोजी संप करण्याचा निर्धार केला होता. मात्र सरकारने भाडेवाढ करण्याचे आश्वासन रिक्षा-टॅक्सी संघटनांना दिला होता. मात्र त्याची अद्याप कोणतीही सुनावणी केलेली नाही. खटुवा समितीच्या निर्देशानुसार महागाई निर्देशांक तपासून रिक्षा-टॅक्सी संघटनांना भाडेवाढ करण्याची मागणी केली जात आहे.

मात्र सरकारने अजूनही भाडेवाढ न केल्याने मुंबई रिक्षा-टॅक्सी मेन्स युनियनने पुन्हा १५ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये टॅक्सी चालकांनी किमान ३५ रुपये भाड वाढ करण्याची मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे. खटुवा समितीच्या निर्देशांनुसार जी भाडेवाढ करण्यात येईल ती मान्य करण्यात येईल अशी, असे टॅक्सी संघटनांकडून सांगण्यात आले. मुंबई रिक्षा-टॅक्सी मेन्स युनियनने ११ सप्टेंबरला वार्षिक बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये संपाची ध्येयधोरण ठरवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

भाडेवाढ बाबत राज्य सरकारकडून वेळोवेळी आश्वासन देण्यात येत होते. इंधनाचे दर गगनाला भिडले असून, रिक्षा-टॅक्सी चालकांना नाहक तोटा सहन करावा लागत आहे. रिक्षा-टॅक्सी संघटनानी महानगर गॅस लिमिडेट कंपनीने गॅस दरात कपात केली असता भाडेवाढ करण्याचं आवश्यकता नाही. मात्र गॅस कंपनीने यावर काहीच उपाययोजना अद्याप केलेली नाही. भाडेवाडी बाबत लेखी आश्वासन देऊन सुद्धा अजून कोणतीही प्रतीक्षाच करावी लागत आहे. या कारणामुळे १५ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी संघटना संपावर जाण्यसाठी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Exit mobile version