केदारनाथ धाम येथे सेल्फी काढण्याच्या नादात एका सरकारी अधिकाऱ्याता हेलिकॉप्टरच्या शेपटाकडील पंख्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अधिकारी उत्तराखंडचा सरकारी अधिकारी होता.
रविवारी केदारनाथ येथे हेलिकॉप्टरच्या मागे उभा राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्न करताना त्याचा हेलिकॉप्टरच्या मागील बाजूला असलेल्या पंख्याच्या संपर्कात आला आणि त्याचा मृत्यू झाला.
जितेंद्र कुमार सैनी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. हेलिकॉप्टरच्या मागील बाजूस असलेल्या टेल रॉटर ब्लेडच्या संपर्कात तो आला आणि त्याच्या फटक्यामुळे त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. चार धाम यात्रेला प्रारंभ झाल्यादिवशीच ही दुर्दैवी घटना घडली.
हे ही वाचा:
अक्षय्य तृतियेला ४ चाकी गाड्यांची खरेदी ४४ टक्क्यांनी वधारली!
पुलेल्ला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमींची हॅट्ट्रिक
सत्यपाल मलिक यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे
पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा पोलिसांच्या जाळ्यात
अक्षय तृतियेच्या निमित्ताने ही चारधाम यात्रा सुरू करण्यात आली. गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून त्यासाठी यात्रेकरू मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. या यात्रांसाठी १६ लाख भाविकांनी आपली नावे नोंदविली आहेत. दरम्यान, केदारनाथ २५ एप्रिलपासून खुले होणार आहे तर बद्रिनाथ हे २७ एप्रिलला खुले होईल.