नाशिक महापालिकेच्या आवारात बेडसाठी आंदोलन करणाऱ्या बाबासाहेब कोळे या कोरोना रूग्णाचा गुरूवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूसाठी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता मृत रूग्णाच्या पत्नीनेच आपल्या नवऱ्याच्या मृत्यूला मनपा आयुक्त आणि आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.
बुधवारी नाशिकमध्ये बाळासाहेब कोळे या कोरोना रुग्णाने अनोखे आंदोलन केले. कोविड पॉजिटीव्ह आलेल्या या रुग्णाला रुणालयात बेड मिळत नव्हता. म्हणून हा रुग्ण चक्क ऑक्सिजन सिलेंडर लावलेल्या अवस्थेत थेट महापालिकेच्या आवारात पोहोचला. या रुग्णाला पाहून महापालिकेत एकच गोंधळ उडाला. अखेर महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णाला बेड मिळवून दिला गेला. बिटको रुग्णालयात त्याला बेड मिळवून देण्यात आला. पण याच रुग्णालयात ऍडमिट असताना या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात दीपक डोके या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकृती ठीक नसताना कोरोना रुग्णाला आंदोलन करण्यास भाग पडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवत सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला.
पण आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. मृत बाबासाहेब कोळे यांच्या पत्नीने सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सुरेखा कोळे यांनी आपल्या पतीच्या मृत्यूसाठी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणीभूत धरले आहे. तसेच त्यांच्यावर सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे. बिटको रूग्णालयात आपल्या पतीला तासभर विना ऑक्सीजन सिलेंडरचे तात्कळत ठेवले असे आरोप या पत्रात करण्यात आला आहे. तर दीपक डोके हे आपल्या पतीला बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आपल्या पतीचा मृत्यू झाला असा ठपका त्यांनी ठेवला आहे. तर आपल्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सरकार आणि महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध
एलडीएफने भगवान अय्यपांच्या भक्तांचं स्वागत पायघड्यांऐवजी लाठीने केले