सबका साथ, सबका विकास म्हणत सत्तारूढ झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे देशभरातील विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणताना दिसते. त्याचाच एक भाग म्हणजे आता भारतातील तृतीयपंथी नागरिकांसाठी मोदी सरकार एक नवी योजना आणत आहे. तृतीयपंथी नागरिक हे अनेकदा समाजातील दुर्लक्षित घटक समजला जातो. पण याच तृतीयपंथी नागरिकांच्या विकासासाठी आता भारत सरकार पाऊले उचलताना दिसत आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे तृतीयपंथी नागरिकांसाठी एक विशेष योजना बनवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील वंचित आणि गरजू तृतीयपंथीयांना घरे दिली जाणार आहेत. समजतील वंचित आणि गरजू अशा सर्व तृतीयपंथीयांसाठी, ‘गरिमा गृह’ या नावाने निवारा घरे बांधण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून. सुरवातीच्या टप्प्यात अशा प्रकारची १२ घरे सरकारतर्फे बांधण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह
एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही
रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम
राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार
सध्या प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ आणि ओडिसा या राज्यांमध्ये ही ‘गरिमा गृह’ बांधली जात आहेत. या निवारा केंद्रांचा मुख्य उद्देश तृतीयपंथी लोकांना सन्मानाने जीवन जागता येईल, असे सुरक्षित घर बांधून देणे हा आहे. या निवारा केंद्रांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा जसे की अन्न, वैद्यकीय शुश्रूषा, मनोरंजनाची साधने उपलब्ध असतील. तसेच, यात तृतीयपंथीयांसाठी क्षमता बांधणी आणि कौशल्य विकास कार्यक्रम देखील घेतले जातील.