22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेष'राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार यावं'

‘राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार यावं’

भाजपा नेते नितेश राणेंचं सिद्धिविनायक चरणी साकडं

Google News Follow

Related

विधानसभेचे मतदान पार पडले असून उद्या २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निकालासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले असून कोणता उमेदवार निवडून येईल, राज्यात पुन्हा कोणाचे सरकार स्थापन होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याच दरम्यान, राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आले पाहिजे, असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. यासाठी नितेश राणे यांनी सिद्धिविनायक चरणी साकडं घातलं आहे. तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय यांची २५ तारखेची सकाळ आर्थर रोडच्या जेलमध्ये होईल, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात येवून दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आले पाहिजे, देवाकडे हेच मागनं आहे. देव देवतांचे, हिंदू समाजाचे संरक्षण करण्यासाठी राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे, महायुतीचे सरकार आले पाहिजे आणि प्रचारात देखील तसेच वातावरण आम्हाला दिसले आहे. पुढच्या २४ तासात माझी पुन्हा प्रतिक्रिया घ्याल तेव्हा आम्हाला बहुमत मिळालेले असेल, असे नितेश राणे म्हणाले.

एक्झिट पोलच्या आकडेवारीवर नाना पटोले आणि संजय राऊत यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करत हे सर्व फेक असल्याचे म्हटले. यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले,  नाना पटोले आणि संजय राऊत यांना स्वप्न भंग होताना दिसत आहे. संजय राऊत यांचा २५ तारखेचा दिवस कुठे उजाडेल, याची त्यांना कल्पना नाही. कदाचित संजय राऊत यांची २५ तारखेची सकाळ आर्थर रोडच्या जेलमध्ये उजाडू शकते. मविआमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे अशी वक्तव्य करत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

ज्ञानवापी प्रकरण: पुरातत्व सर्वेक्षणाच्या हिंदुंच्या याचिकेवर मुस्लिम पक्षाकडून मागवले उत्तर

कुस्तीपटू विनेश फोगट बेपत्ता, पोस्टर्स व्हायरल!

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी चकमक, १० नक्षलवाद्यांचा खात्मा

अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा