खासगी वाहनांवर सरकारी पाट्या लावताय मग शिक्षेला तयार राहा

खाजगी वाहनावर सरकारी पाठ्या लावून, वाहनाचे नियम मोडणारे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनावर आता कारवाई करण्यात येणार आहे.

खासगी वाहनांवर सरकारी पाट्या लावताय मग शिक्षेला तयार राहा

खासगी वाहनावर सरकारी पाट्या लावून, ऐटीत फिरणाऱ्या चालकांना आता कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. कायद्याने मनाई असताना अनेक सरकारी कर्मचारी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रास पोलीस, भारतीय सैनिक, भारत सरकार, महाराष्ट्र शासन ते अगदी न्यायाधीश अशा प्रकारच्या पाट्या खाजगी वाहनाच्या दर्शनी भागात ठेवण्यात येतात. तसेच काही खाजगी वाहनाच्या दर्शनी भागात पोलीस अधिकाऱ्यांच्या टोप्या ठेवण्यात येतात.

विशेष करून ही वाहन परिवारासह फिरण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून अशा पाट्यांचा वापर करून नियम मोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला, खडकवासला धरण अशा ठिकाणी वाहन कोंडी झाली असताना, या बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांची दादागिरी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा पाट्या लावून गुन्हेगार याचा गैरफायदा घेऊ शकतात. वाहतूक पोलीस किंवा आरटीओ अशी बेकायदेशीर पाट्या लावल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्या कारवाईमध्ये पहिल्यांदा कृत्य केल्यास १०० रुपये, तर दुसऱ्यांदा नियम मोड्ल्यास ५०० रुपये दंड होऊ शकतो. अशी माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे विधिज्ञ, वकील शरद भोईटे यांनी दिली.

हे ही वाचा:

इतर राज्यातल्या पण जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना करता येणार मतदान

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

परिणामी सुट्ट्यांच्या दिवशी सरकारी नावांच्या पाट्या लावून खाजगी वाहन चालक मधेच वाहन घुसवतात. त्याचप्रमाणे जोरजोरात हॉर्न वाजवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे असे प्रकार सुरु असल्याचे दिसते. सर्वसामान्य नागरिकाने वाहनांच्या नियमाचे पालन न केल्यास त्यांना दंड आकारण्यात येतो. मात्र अशा सरकारी पाट्या लावून फिरणाऱ्या वाहनावर पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत असे दिसून येते. तसेच खाजगी वाहनांवर शासकीय नावांचे बोर्ड लावणे बेकायदेशीर आहे. अशा वाहनांचे फोटो काढून ठेवावेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version