सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!

दळणवळण मंत्री देवुसिंह चौहान यांनी दिली माहिती

सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!

एक मोठी कारवाई करत भारत सरकारने एकूण ५५ लाख फोन नंबर ब्लॉक केले आहेत. सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या बदल्यात ही सिम मिळवण्यात आली होती.यावर सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

भारतात सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर घोटाळ्याची नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत. यातील बहुतांश लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर काही प्रकरणांमध्ये लोकांचे एक कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. या संदर्भात संसदेत माहिती देताना दळणवळण मंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की, बनावट ओळखपत्राच्या मदतीने घेतलेले मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले आहेत.ही संख्या जवळपास ५५ लाख मोबाईल क्रमांक इतकी आहे.याशिवाय सायबर फसवणुक संबंधित १.३२ लाख मोबाईल फोनही ब्लॉक करण्यात आले आहेत. ही एक मोठी कारवाई आहे.

केंद्र सरकारने ‘संचार साथी पोर्टल’वरून बनावट कागदपत्रांवर मिळवलेली सिमकार्डे ओळखली गेली आहेत.एवढेच नाही तर लोकांकडून आलेल्या तक्रारींवर कारवाई करत सरकारने १३.४२ लाख कनेक्शन ब्लॉक केले आहेत.ते म्हणाले की, बनावट कागदपत्रांच्या आधारे हे सिमकार्ड खरेदी केले जात असे आणि त्याद्वारे सायबर फसवणूक आणि लोकांची फसवणूक केली जात असे.

हे ही वाचा:

पंजाबच्या तुरुंगात अंमली पदार्थांची विक्री, चुकीचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन!

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या आणि घोटाळे केल्यामुळे त्यांना पक्षातून हाकलून दिलं!

मुंबई प्रदूषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास

विश्वातील कोणतीही शक्ती ३७० कलम परत आणू शकत नाही

संचार साथी पोर्टल म्हणजे काय? 
लोकांच्या सोयीसाठी संचार साथी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने चोरीला गेलेला किंवा हरवलेला स्मार्टफोन सहज सापडू शकतो. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास, तुम्ही तत्काळ या पोर्टलवर त्याची तक्रार करू शकता.

तुम्ही तक्रार केल्यानंतर तुमचा फोन ब्लॉक केला जाईल, जेणेकरून तुमच्या फोनमधून महत्त्वाचे तपशील लीक होणार नाहीत आणि फोनचा वापर चुकीच्या पद्धतीने होणार नाही. चोराने तुमचे सिम काढून त्या फोनमध्ये दुसरे सिम टाकल्यास तेही ब्लॉक केले जाईल. इतकंच नाही तर तुमच्या डॉक्युमेंटवर इतर कोणी सिम चालवत नसेल तर हे देखील संचार साथी पोर्टलवरून तपासता येईल.

 

Exit mobile version