आता करता येणार सांस्कृतिक वारशाचा अभ्यास

आता करता येणार सांस्कृतिक वारशाचा अभ्यास

सांस्कृतिक मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन होणार आहे. त्याबरोबरच देशाच्या सांस्कृतिक संशोधनाला चालना देखील मिळणार आहे.

केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने नोएडा, गौतम बुद्ध नगर येथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ हेरिटेज स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या संस्थेमुळे देशाच्या वारशाबाबत संशोधनाला आणि संवर्धनाला गती मिळेल, अशी आशा देखील व्यक्त केली आहे. ही देशातील या प्रकारची एकमेव संस्था असणार आहे. सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती.

हे ही वाचा:

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे टीसींशी रोज होत आहेत वाद

‘महाविकास आघाडी सरकार गरीबविरोधी; त्यांना वसुलीतच स्वारस्य’

रेल्वे प्रवास कागदावर सोपा, प्रत्यक्षात कठीण

१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

या संस्थेमध्ये सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टीने असे विविध विषय शिकवले जाणार आहेत. विविध ज्ञानशाखांमधील अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. कला शाखेतून इतिहास, संवर्धन, म्युझिओलॉजी, आर्कायव्हल स्टडिज्, पुरातत्त्वशास्त्र, नाणेशास्त्र, हस्तलिखीतशास्त्र इत्यादी विषयांत पी.एच.डी उपलब्ध होणार आहे.

हे स्वतंत्र विद्यापीठ राहणार असून, काही इतर संस्थांच्या एकत्रिकरणातून या विद्यापीठाची निर्मिती होणार आहे. इन्स्टिट्युट ऑफ आर्किऑलॉजी (पं. दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्युट ऑफ आर्किऑलॉजी) नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाच्या अंतर्गत स्कूल ऑफ आर्कायव्हल स्टडिज, नवी दिल्ली, नॅशनल रिसर्च लॅबोरेटॉरी फॉर कॉन्जर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी, लखनऊ, नॅशनल म्युझियम इन्स्टिट्युट ऑफ हिस्टरी ऑफ आर्ट, इत्यादी विविध संस्थांचे विलीनीकरण करून या विद्यापीठाची निर्मिती होणार आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या इन्स्टिट्युटमुळे संवर्धन आणि संशोधनात जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच संसोधन, विकास आणि ज्ञान वाढण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version