26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकचऱ्यातून मिळाले तब्बल २५२ कोटी रुपयांचे उत्पन्न

कचऱ्यातून मिळाले तब्बल २५२ कोटी रुपयांचे उत्पन्न

स्वच्छता मोहीम

Google News Follow

Related

मोदी सरकारने गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेची विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेचे फलित म्हणजे स्वच्छता मोहिमेंतर्गत गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यातून सरकारला आतापर्यंत तब्बल २५२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अभियानांतर्गत शासकीय कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक कचरा व निरुपयोगी शासकीय फायली नष्ट करण्याचे काम करण्यात येत आहे. या मोहिमेचे संचालन करणाऱ्या कार्मिक मंत्रालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यातून सरकारला आतापर्यंत २५२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ही मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अशाच एका मोहिमेत सरकारने कचरा विकून ६२ कोटी रुपये कमावले होते.

संगणक आणि इतर प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याशिवाय सरकारी कार्यालयांमध्ये निरुपयोगी ठरलेल्या फायलीही काढल्या जात आहेत. याअंतर्गत एकट्या केंद्रीय सचिवालयात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक फाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सुमारे ३१ लाख ई-फाईल्स आहेत, तर ८ लाखांहून अधिक पेपर फाइल्स असल्याचे कार्मिक मंत्रालयाने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले

गुगलला पुन्हा एकदा दणका

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

 

कचरा साफ, ३७.१९ लाख चौरस फूट जागा रिकामी
आणखी एक आश्‍चर्यकारक बाब म्हणजे विविध कामांसाठी वापरला जाणारा कचरा साफ केल्यामुळे कार्यालयांमध्ये ३७.१९ लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आहे. यामध्ये वाचनालय, कॅन्टीन ते सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम ३१ ऑक्टोबर म्हणजेच सरकार पटेल यांच्या जयंतीपर्यंत चालणार आहे. केंद्र सरकारची कार्यालये आणि युनिट्स व्यतिरिक्त, ही मोहीम सर्व राज्य सरकारे आणि अगदी राजभवनातही चालविली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा