सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

उपोषण कर्त्यांची घेणार भेट

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

ओबीसी आरक्षणावर गदा येऊ नये याकरिता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं मागील १० दिवसांपासून जालन्यात उपोषण सुरु आहे. दरम्यान, उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना झाले असून उपोषण कर्त्यांची भेट घेऊन ते उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहेत.

ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल राज्यसरकारसोबत चर्चा केली. यामध्ये बैठकीमध्ये ओबीसी नेते, मराठा समाजाचे नेते, यांच्यासह जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठा समाजातील सगेसोयरेंच्या बाबतीत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

हे ही वाचा:

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

मराठा समाज आणि ओबीसी समाजावर अन्याय होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. बैठक पार पडल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तसेच सरकारचं शिष्टमंडळ शनिवारी(२२ जून) वडीगोद्री आणि पुण्यात चालू असलेल्या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करेल, असे त्यांनी सांगितले.

यानंतर आज सरकारच शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना झाले असून उपोषण कर्त्यांची ते भेट घेणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळात एकूण १२ जणांचा समावेश असून त्यामध्ये पाच मंत्र्यांचा समावेश आहे.

 

Exit mobile version