नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी २८ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली. अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी शुक्रवारपासून या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपला होता.

डिसेंबरमध्ये सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक करण्यात आली नव्हती. आता ही जबाबदारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना देण्यात आली आहे. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. नागेश्वरन यांनी १९८५ मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. तसेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि अमहर्स्ट मॅसेचुसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय

मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर

डॉ नागेश्वरन यांचे विपुल लेखन प्रकाशित आहे. यापूर्वीही त्यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे. भारत आणि सिंगापूर येथील अनेक व्यावसायिक संस्थांमध्ये त्यांनी शिकवले आहे. ते आयएफएमआर ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेस येथे डिन म्हणून आणि क्रिया विद्यापीठ (Krea University) येथे अर्थशास्त्राचे अर्धवेळ प्राध्यापक राहिले आहेत. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे २०१९ ते २०२१ या काळात अर्धवेळ सदस्य होते.

Exit mobile version