ने मजसी ने मातृभूमीला आणि जयोस्तुते जयोस्तुते या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जगप्रसिद्ध कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या पाहिजेत, असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुरस्काराचे वितरण पार पडले. या वर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पार पडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. राज्यपाल म्हणाले की, सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला हवं. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. येत्या २८ मे रोजी सावकरांची १४० वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही राज्यपाल बैस यांनी दिली.
हे ही वाचा:
पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला
…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!
कोल्हापुरातील खाशाबा जाधवांचा विजय स्तंभ झाला ‘पराभूत’
अपघातानंतर अपंगत्व आलेल्या तरुणाला मिळाली दीड कोटीची भरपाई !
राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, वीर सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीचे महानायक होते. ते एक विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव स्वातंत्र्यसैनिक होते. त्याचे विचार कालातीत आहेत. सावरकर म्हणजे प्रतिभा, सावरकर म्हणजे त्याग. सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढणारा तो योद्धा होता. ते एक महान समाजसुधारक होते. ते म्हणाले की, सावरकरही जातीव्यवस्थेच्या विरोधात होते.
राज्यपालांनी सांगितले की, सावरकर म्हणत, जोपर्यंत आपण जातीवरून विभागलेले राहू, तोपर्यंत बाहेरचे लोक याचा फायदा घेत आपल्याला आपसात भांडायला लावतील. यावेळी त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. सावरकर एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचं वर्णन आपल्या पुस्तकातून अधोरेखित केलं आहे. मधल्या काळात अनेक क्रांतीकारकांबद्दल एक नॅरेटिव्ह तयार केला गेला. या क्रांतिकारकांना बदनाम केलं गेलं. सावरकारांना नाकारणं म्हणजे सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि जवानांचं बलिदान नाकारणं आहे, असं रमेश बैस म्हणाले.
सावरकर यांचे कार्य महान आहे. त्यांचे विचार उत्तुंग होते. सावरकर फक्त व्यक्ती नाही तर विचार आहेत. आपण सावरकरांचे अनेक प्रकारे वर्णन करू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठे आहे. काही वेळा त्यांच्या विषयी विरोधात लिहिले गेले आहे. पण ते सगळं विसरून या ठिकाणी त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत. त्यासाठी सावरकर यांच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
नाना पटोले यांचं वक्तव्य
या मुद्द्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवभारत टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, सध्या राज्यात त्यांचे सरकार आहे. आता त्यांनी गोडसेची गोष्ट किंवा सावरकरांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करावी. हा त्याचा विषय आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकारला सार्वजनिक चिंतेच्या मुद्द्यांवरही बोलण्यास सांगावे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकार या विषयावर तोंड का उघडत नाही?.