24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषएअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

तक्रारी करताच व्यक्त केली दिलगिरी

Google News Follow

Related

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमानाला गुरुवारी उशिरा झाला. मात्र, यामुळे विमानातील प्रवाशांना जबरदस्त मनस्ताप सहन करावा लागला. माहितीनुसार, दिल्लीहून सॅन फ्रान्सिकोला जाणारे एअर इंडियाचे विमान ३० मे रोजी दुपारी ३.२० मिनिटांनी उड्डाण घेणार होते. मात्र, हे विमान आता उशीर होऊन शुक्रवारी ३१ मेच्या सकाळी ११ वाजता उड्डाण घेईल. यादरम्यान प्रवाशांना मात्र हाल सहन करावे लागले.

प्रवाशांना तब्बल आठ तास एसीशिवाय फ्लाइटमध्ये बसवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय उकाड्यामुळे काही जणं बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आलं. एक्सवर अनेकांनी हा भयानक अनुभव आणि तक्रारी शेअर केल्या आहेत. ऑपरेशनल समस्यांमुळे फ्लाइटला उशीर झाला, अशी माहिती एअर लाइनकडून देण्यात आली आहे. विलंबानंतर, एअर इंडियाने सर्व प्रवाशांना पूर्ण परतावा आणि हॉटेलमध्ये राहण्याची ऑफर दिली आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

गुरुवारी पत्रकार श्वेता पुंज यांनी ट्विटरवर पोस्ट करीत लिहिलं की, एआय १८३ विमानाला आठ तास उशीर झाला होता. विमानात बसवल्यानंतर प्रवाशांना एसीशिवाय ठेवण्यात आलं. काही प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून खाली उतरविण्यात आलं. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना टॅग करीत पुंज यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, खाजगीकरणामुळे कोणती गोष्ट सर्वात अयशस्वी झाली असेल तर ती एअर इंडिया आहे. दरम्यान, एअर इंडियाकडून प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. अशातच दिल्ली आणि उर्वरित उत्तर भारतात उष्णतेचा पारा चढला आहे. त्यामुळे लोक गरमीने अधिक हैराण झाले असताना त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा