25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषफेसबुकवर ओळख झाली, भगतसिंग नावाचा ग्रुप बनवला आणि संसदेवर हल्ला केला!

फेसबुकवर ओळख झाली, भगतसिंग नावाचा ग्रुप बनवला आणि संसदेवर हल्ला केला!

एक ते दीड वर्ष संपर्कात राहून हल्ल्याचा कट रचला

Google News Follow

Related

१३ डिसेंबर बुधवार रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.सहावा आरोपी अद्याप फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले.त्यांनी मिळून एक ग्रुप बनवला आणि संसदेवर हल्ला करण्याचा कट रचला.

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना दोन तरुण प्रेक्षक गॅलरीमधून उड्या मारत अधिवेशनाच्या कामात व्यत्यय आणला.या तरुणांनी घोषणाबाजी करत नळकांड्या फोडल्या.संसदेच्या बाहेर देखील दोघांनी घोषणाबाजी करत नळकांडी फोडल्या.यामध्ये एका महिलेचा आणि एक तरुणाचा समावेश आहे.या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी फरार आहे. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे.

तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे चौघेही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. एक ते दीड वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी फेकबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चार आरोपी एक ते दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर भेटले.त्यानी मिळून भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला.त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आरोपी विकी शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे.मात्र, सहावा आरोपी ललित झा अजूनही फरार आहे.१३ डिसेंबरच्या ३ दिवस अगोदर आरोपी मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे दिल्लीत आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता, मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई याबाबत घेतलेली केंद्र सरकारने भूमिका मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे याना पटली नसल्याने हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाले.या आरोपींवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी कलम ४५२ , १२०-B आणि UAPA यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

‘शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजेंवर नवी जबाबदारी सोपवणार’

आसाममधील एक हजार २८१ मदरसे कायमचे बंद!

मराठा आरक्षणासाठी तरुणाची विष घेऊन आत्महत्या

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार

दरम्यान, या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने सुरक्षेतील त्रुटींबद्दल आठ सुरक्षा कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.तसेच गृह मंत्रालयाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून तपासाचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रमुखाची नियुक्ती केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा