अबब! आयपीएलमध्ये दोन्ही डावात मिळून ५२३ धावांचा डोंगर

अबब! आयपीएलमध्ये दोन्ही डावात मिळून ५२३ धावांचा डोंगर

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नावावर होता. आरसीबीने आयपीएल २०१३ मध्ये २६३ धावा केल्या होत्या. पण आता सनरायझर्स हैदराबादने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात ४० षटकांत डोंगराएवढ्या ५२३ धावा झाल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही डावात मिळून ५०० पेक्षा जास्त धावा झाल्या.

हेही वाचा :

28 mar 2024

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू

हैदराबादच्या २७७ धावांपुढे मुंबईची शरणागती

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार गटाला दिल्यास सामुहिक राजीनामे देणार

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात विक्रमी ३८ षटकार लगावले. त्याचबरोबर दोन्ही संघातील एकूण ४ फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या डावात राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक धावा केल्या. आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरुद्ध २२६ धावांची मजल मारली होती.

या सामन्यात एकूण ३८ षटकारांसह ६९ चौकारांचा समावेश होता. यापूर्वी आयपीएल २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात ६९ चौकार मारले होते.

Exit mobile version