अवकाश यानात शिरला गोरिला आणि…

अवकाश यानात शिरला गोरिला आणि…

अंतराळ स्थानकाच्या आत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ‘ गोरिला ‘ ने प्रवेश केला तर… हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. घरात किंवा घराच्या आवारात एखादा प्राणी घुसला तर माणसाला लपण्याचे किंवा जीव वाचवण्याचे अनेक मार्ग असतात. पण विचार करा की अंतराळात, बंद अवकाश यानाच्या आत जर एखाद्या ‘ गोरिला ‘ घुसला तर काय होईल? हे दृश्य नुकतेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पेस स्टेशनच्या शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात गोरिला चक्क उडताना दिसत आहे. वास्तविक, हा अवकाशातील खरा गोरिला नाही. डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, संपूर्ण प्रकरण असे आहे की, २०१६ मध्ये मार्क केली नावाच्या अंतराळवीर त्याच्यासोबत अंतराळात गोरिला सूट घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते.

स्पेस स्टेशनवर ३४० दिवस घालवल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसोबत विनोद करण्याची शक्कल लढवली. तो गोरिला सूट घालून तयार झाला आणि स्पेस स्टेशनच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेला. आणि स्पेस स्टेशनवर फिरू लागला. जेव्हा त्याचे सहकारी टिम पीक याने स्टेशनवर गोरिलाला पाहिले तेव्हा तो घाबरला आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी उड्डाण करू लागला.

हे ही वाचा:

बीडची लेडी सिंघम ठरली ‘मिस महाराष्ट्र’

सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!

महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय

…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!

या प्रँकचा १५ सेकंदचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांकडून यावर प्रतिक्रियाही येत आहेत. ३.७ दशलक्ष लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेतला आहे.

Exit mobile version