गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे. भाजपाने संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज दाखल करताच भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपाळ शेट्टी लढण्यावर ठाम होते. परंतु, अखेर आज गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. गोपाळ शेट्टींच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटकरत आभार मानले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर माजी खासदार गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!शेट्टी म्हणाले, माझी लढाई एक विशिष्ठ कार्यपद्धतीवर होती. माझ्या निर्णयानंतर भाजपाचे अनेक नेते मला भेटायला आहे.  ‘गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!शेट्टी लढतोय तर लढू दे, काय फरक पडतोय,’ असा पक्षाने विचार केला नाही, माझी समजूत काढण्यासाठी अनेकांनी अनेकवेळा भेटी घेतल्या. त्यामुळे मी आता माघार घेत आहे, माझा मुद्दा पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे आणि समाधानकारक बोलणे झाले आहे.

हे ही वाचा :

प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

कलम ३७० रद्द करण्याच्या ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत कल्लोळ

जरांगेंची निवडणुकीतून माघार, भुजबळ म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’

कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!

तसेच बाहेरील उमेदवार आणू नये, अशा मताचा मी नाहीये. पण सक्षम उमेदवार असेल तर त्याला निवडून आणावा लागतो. लोकांच्या हितासाठी हे सर्व करावे लागते. मात्र, सातत्त्याने अशा गोष्टी घडत असल्याने मी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आता माघार घेत आहे, असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

दरम्यान, गोपाळ शेट्टी यांच्या माघारीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटकरत त्यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टीजी यांनी पक्षहिताचा निर्णय घेत एक सच्चा कार्यकर्ता कसा असतो, याचे उत्तम उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. पक्षहित कायम त्यांनी सर्वोच्च ठेवले आणि त्याच्याशी कधीच तडजोड केली नाही. हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

Exit mobile version