25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषगुगलची मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरील २,५०० लोन ऍप्स हटवले

गुगलची मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरील २,५०० लोन ऍप्स हटवले

फेक लोन ऍप्सवर कारवाई

Google News Follow

Related

देशात कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या ऍप्सचे जाळं पसरत असून दररोज हजारो लोकांची फसवणूक केली जात आहे. यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. तर, केंद्र सरकारकडूनही खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच गुगलने प्ले स्टोअरवरील लोन ऍप्सवर कारवाई केली आहे.

काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे अनेक ऍप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच ऍप्स जास्त कागदपत्रे न घेता पैसे देतात. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा ऍप्सची मदत घेतात. मात्र, यांपैकी बऱ्याच ऍप्सचे कर्मचारी त्यानंतर ग्राहकांना मानसिक त्रास, धमक्या द्यायला सुरू करतात. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील होते. अशाच फेक लोन ऍप्सवर गुगलने मोठी कारवाई केली आहे.

यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलने प्ले स्टोअरवर असणारे तब्बल २ हजार २०० फेक लोन ऍप्स डिलीट केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत ३ हजार ५०० ते ४ हजार लोन ऍप्सची पडताळणी केली. यानंतर सुमारे अडीच हजार ऍप्स डिलीट केले. यानंतर सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये देखील गुगलने असेच २ हजार २०० ऍप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत.

हे ही वाचा:

घड्याळ आणि राष्ट्रवादी अजितदादांकडे, शरद पवारांनी नाव व चिन्ह गमावले

राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेले बिस्किट दिल्याने हंगामा

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

निवृत्त सैनिक बनला होता लष्करचा दहशतवादी, दिल्लीतून अटक!

गुगलने अशा ऍप्ससाठी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. केवळ रजिस्टर्ड संस्था किंवा रजिस्टर्ड संस्थांसोबत काम करणाऱ्या ऍप्सनाच प्ले स्टोअरवर स्थान देण्यात येत आहे. देशातील वाढत्या लोन ऍप्समुळे आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा