प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना गुगलने आज भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असून हा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे या खास दिनाचा, वर्षाचा जल्लोष देशभरात पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये उंट, हत्ती, कबूतर, सॅक्सोफोन, घोडे, तबला आदींचा समावेश आहे. गुगलने अक्षरांवरील सजावटीने भारताचे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे. भारताच्या संस्कृती आणि वारशाची एक झलक गुगलने प्रदर्शित केली आहे. गुगलच्या डुडलमध्ये एक हत्ती, एक घोडा, एक कुत्रा, एक उंट, तबला, संचलन मार्ग, आयकॉनिक कॅमल-माउंटेड बँडचा भाग म्हणून सॅक्सोफोन, कबूतर आणि राष्ट्रध्वज दर्शवणारा तिरंगा रंगाचा समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू

भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट

आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!

सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित

२६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण जग भारताचा सांस्कृतिक वारसा, सैन्य ताकद आणि विकासाची झलक पाहते आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता दिसून येणार आहे.

Exit mobile version