गुगलने खाशाबा जाधव यांना केले असे अभिवादन

बनवले खास डूडल.

गुगलने खाशाबा जाधव यांना केले असे अभिवादन

कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची आज ९७ वी जयंती आहे. त्या निमित्तानं गूगलनं खास डूडल तयार करुन त्यांना अभिवादन केलं आहे.खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला.

खाशाबा जाधव यांनी त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीनं भारताचं नाव जगभरात पोचवले. खाशाबा यांचे वडील दादासाहेब जाधव हे ख्यातनाम पैलवान होते. जेव्हा खाशाबा हे पाच वर्षाचे होते, तेव्हापासूनच त्यांचे वडील त्यांना कुस्ती विषयी मार्गदर्शन देत होते. केडीआणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते. खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या विषयीचा एक धडा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमांत समाविष्ट केला आहे. त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. या डूडल मध्ये कुस्तीचा आखाडा दिसत असून खाशाबा जाधव यांचे चित्र देखील दिसत आहे.

 

लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची १९४८ साली निवड झाली होती तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोचणारे भारत देशातील ते एकमेव आणि पहिले खेळाडू होते. १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. १९४८ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत त्यांना सहावा क्रमांक मिळाला होता.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

खाशाबा जाधव हे १९५५ साली महाराष्ट्र पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर या भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर खेळांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून ते निवृत्त झाले. १९८४ मध्ये एका अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले.२००१ मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम.

Exit mobile version