27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषकोविड काळात गुगलचेदेखील भारताला सहाय्य

कोविड काळात गुगलचेदेखील भारताला सहाय्य

Google News Follow

Related

तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगलच्या समाजसेवीविभागाने भारताला कोविड काळासाठी ११३ कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. गुगलकडून होणारी ही मदत ८० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवकांच्या कौशल्यविकसनासाठी वापरण्यात येणार आहे. ही मदत विविध संस्थांच्या सहाय्याने देण्यात येणार आहे.

गुगल ८० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि ग्रामीण भागातील किंवा अती-आवश्यक क्षेत्रातील विविध आरोग्य सुविधा यांच्या विकासासाठी ९० कोटी रुपये गिव्ह इंडिया आणि १८.५ कोटी रुपये पाथ या संस्थेसाठी देण्यात येणार आहेत.

हे ही वाचा :

मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार

रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

या व्यतिरिक्त गुगलकडून अपोलो मेडस्किल या संस्थेला देखील सहाय्य करण्यात येणार आहे. याचा वापर ग्रामीण भागातील २०,००० फ्रंटलाईन कामगारांच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणार आहे. कोविड १९चे व्यवस्थापनाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी हे सहाय्य करण्यात येणार आहे.

गुगलकडून केली जाणारी मदत ही आशा सेविकांच्या प्रशिक्षणासाठी देखील असणार आहे. देशातील १५ राज्यांतील आशा सेविकांचे प्रशिक्षण करण्यात येणार आहे. भारताच्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी आणण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात येणार आहे. गुगलने या सहाय्याची घोषणा एप्रिल महिन्यात केली होती. याशिवाय जगातील विविध गुगल कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे दुर्लक्षित आणि मागास समुहांसाठी सात दशलक्ष डॉलरची सहाय्य करण्याचे निश्चित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा