गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली

कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा उल्लेख हा गुगलवर पायरेट म्हणजे लुटारु किंवा समुद्री चाचा असा दिसून येत होता.

गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली

छत्रपती शिवाजी महाराज यांनी साकारलेल्या हिंदवी स्वराज्यातील मराठा आरमार उभारण्यात मोलाचा वाटा असणारे आणि त्याचे प्रमुख अशी ओळख असलेले कान्होजी आंग्रे यांची गुगलवर अजबच ओळख दाखवत असल्याचे काही दिवसांपूर्वी लक्षात आले होते. कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा उल्लेख हा गुगलवर पायरेट म्हणजे लुटारु किंवा समुद्री चाचा असा दिसून येत होता. यानंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अखेर गुगलने आपली चूक सुधारत कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख नौदलाचे अधिकारी असा केला आहे.

डॉ. भाम्रे यांनी ट्विट करत ही बाब समोर आणली होती. गुगलवर कान्होजी आंग्रे यांचे नाव सर्च करताच त्यांच्या नावाखाली पायरेट असे लिहून येत होते. त्यांच्याबद्दलची ही चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती लोकांपर्यंत पोहचत असल्याचे लक्षात येताच यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच गुगलवर टीका देखील करण्यात आली होती.

त्यानंतर आता या माहितीत बदल करून कान्होजी आंग्रे यांची ओळख नेव्हल ऑफिसर म्हणजेच नौदलाचे अधिकारी अशी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली. कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यात प्रचंड नुकसान झाले होते. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावला होता.

Exit mobile version