29 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषप. बंगालमध्ये मालगाडीची कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक; चार जणांचा मृत्यू

प. बंगालमध्ये मालगाडीची कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक; चार जणांचा मृत्यू

कांचनगंगा एक्स्प्रेसचा न्यू जलपाईगुडी स्थानकावरून सियालदहकडे जात होती

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. कांचनजंगा एक्स्प्रेसने न्यू जलपाईगुडी स्थानकावरून सियालदहकडे आपला प्रवास सुरू केल्यानंतर लगेचच हा अपघात झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला.

पश्चिम बंगालमधील सिलीगुरु येथे सोमवारी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला. ही ट्रेन कोलकात्याच्या सियालदह स्थानकाकडे जात होती आणि सिलीगुडीच्या रंगपानी भागात मालगाडीने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक १३१७४ कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला.  एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपाणी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

स्मृती मंधानाच्या शतकी खेळापुढे दक्षिण आफ्रिका निष्प्रभ

काश्मीरप्रमाणे जम्मूमध्येही ‘शून्य दहशतवाद धोरण’

ईव्हीएम मशीन मोबाईलद्वारे हॅक होऊ शकते का?

अपघाताच्या कारणांची तपासणी केली जात आहे. कटिहार आणि न्यू जलपाईगुडी (NJP) येथून बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. जखमींच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकेही रवाना आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा