देशासह राज्यात घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी कठोर आणि आक्रमक कारवाई केली जात आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही या विरोधात आवाज उठवला आहे. जागोजागी मोर्चे काढून जनजागृती केली जात आहे. मुंबईतही हिंदू जनजागृती समितीकडून मूक निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू संघटनांचे सदस्य, प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शनात उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
‘बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून दादर (प.) रेल्वे स्थानकाबाहेर गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्हा यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तसेच देशभरात बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे राहत आहेत. यामुळे देश आणि राज्याच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ आणि रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. मूक निदर्शानातून याविरोधात आवाज उठवण्यात आला.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक
इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके
‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी
‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन
देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, संशयित ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा अशा काही मागण्या या मूकनिदर्शनात करण्यात आल्या. या विषयीचे फलक उपस्थितांनी हातात घेत निदर्शनात सहभाग घेतला. तसेच प्रशासनाला यासंदर्भातील करण्यात आलेल्या मागण्यांच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा घेण्यात आल्या. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.