वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु असे अनेक मार्ग आहेत ज्यावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या बहुतांश जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत रेल्वे आता या मार्गांच्या वंदे भारतच्या भाड्याचा आढावा घेत आहे. त्यांचे भाडे कमी करण्याची तयारी सुरू आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, भारतीय रेल्वेने वंदे भारतसह इतर रेल्वेच्या भाड्यात २५% टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे.ही कपात एसी चेअर कार आणि सर्व ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यावर लागू होईल.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाच्या आदेशात सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतचे भाडे कमी करण्याचे म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून काही मार्गांवर वंदे भारत गाड्यांमध्ये सीट्स रिक्त असल्याच्या बातम्या समोर आल्या असताना रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तुलनेने लहान रुटवरील वंदे भारत गाड्यांमधील सीट्स पूर्णपणे भरल्या जात नसल्याचे अहवालात म्हटले आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशात, रेल्वेच्या त्या झोनमधून ज्या गाड्यांमध्ये गेल्या ३० दिवसांत ५०% टक्क्यांपेक्षा कमी सीट्स भरल्या गेल्या, त्या गाड्यांमध्ये सवलतीच्या भाड्याची योजना सुरु करण्यासही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भारतात आलेल्या ‘सीमा’ला पुन्हा पाकिस्तानात पाठवा… मोदी सरकारकडे विनंती!
ब्रिटनला भारताने ठणकावले; भारतविरोधी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करा
शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही
‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!
यानंतर, भाडेवाढीचा आढावा घेऊन ते आकर्षक करण्याचा विचार रेल्वे करत असल्याची चर्चा होती. या क्रमाने, रेल्वेने एसी चेअर कार आणि सर्व गाड्यांचे एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे २५% टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर या वंदे भारत ट्रेनच्या भाड्याचा आढावा घेतला जात असल्याचीही माहिती अलीकडेच समोर आली आहे. या गाड्यांमधील सीट मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत.पीटीआयने जूनपर्यंत दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेनमध्ये केवळ २९ टक्के सिट्स भरल्या होत्या. तर इंदूर-भोपाळ ट्रेनमध्ये २१ टक्के सिट्स आरक्षित होत्या. तीन तास प्रवास करणाऱ्या या ट्रेनमध्ये एसी चेअर कारसाठी ९५० रुपये मोजावे लागतात. आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे १,५२५ रुपये आहे.
त्याचप्रमाणे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या केवळ ५५ टक्के जागा भरल्या जात आहेत. भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस (४.५ तासांचा प्रवास) मध्येही सर्व जागा आरक्षित केल्या जात नाहीत. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे कार्यकारी वर्गासाठी २,०४५ रुपये आहे, तर चेअर कारचे भाडे १,०७५ रुपये आहे. भोपाळ ते जबलपूर AC चेअर कारचे भाडे ₹१,०५५ आहे, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या तिकिटाची किंमत ₹१,८८० आहे. मात्र, परतीचे भाडे वेगळे आहे. AC चेअरसाठी ₹९५५ आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ₹१७९० खर्च येतो.