मोदींनी दिली खुशखबर!!

मोदींनी दिली खुशखबर!!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विट करत सर्व भारतीयांना खुशखबर दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रविवारी दोन कोविड १९ लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने बनवलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी याचे वर्णन ‘कोविड विरोधातील लढाईला बळ देणारा निर्णायक क्षण’ असे केले आहे.

“सिरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या लसीची परिणामकारकता ७०.४२% आहे” असे ड्रग्स कंट्रोलर जनरलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तर “भारत बायोटेकने उंदीर,ससा अशा निरनिराळ्या प्राण्यांवर या लसीचा प्रयोग करून याची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्ती तपासली आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ८०० जणांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे. हि लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे.” असे ‘डीसीजीआर’ ने सांगितले आहे.

लसीकरणाच्या प्राथमिक नियोजनानुसार ३० कोटी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने शुक्रवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

या बाबत रविवारी ट्विट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “कोविड विरोधातील लढाईला बळ देणारा निर्णायक क्षण आहे. सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेकच्या लसीला डीसीजीआर ने दिलेली मान्यता ही नव्या सुदृढ आणि कोविड मुक्त भारताच्या वाटेला गतिमान करणारे आहे. भारताचे अभिनंदन…. सर्व मेहनती वैज्ञानिक आणि संशोधकांचे अभिनंदन”

Exit mobile version