होमगार्ड्ससाठी आनंदाची बातमी, मानधन केले दुप्पट!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

होमगार्ड्ससाठी आनंदाची बातमी, मानधन केले दुप्पट!

महायुती सरकारने राज्यातील होमगार्ड्सना आनंदाची बातमी देत विजयादशमीच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारने होमगार्ड्स जवानांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटकरत  ही माहिती दिली. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५५,०००  होमगार्डना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येणार आहे.

गृहमंत्री फडणवीस ट्वीटकरत म्हणाले, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूमध्ये अपघात; अनेक डबे घसरले

महारावांचा नक्षा उतरविणारे शिरवडकर ‘न्यूज डंका’ वर |

अनमोल ‘रतन’ |

उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५,०००  होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Exit mobile version