29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषहरियाणाच्या शाळांमधील विद्यार्थी 'गुड मॉर्निंग' ऐवजी म्हणणार 'जय हिंद'

हरियाणाच्या शाळांमधील विद्यार्थी ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी म्हणणार ‘जय हिंद’

देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत करण्यासाठी सरकारचा निर्णय

Google News Follow

Related

हरियाणातील शाळांमध्ये अभिवादन करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग’ किंवा ‘गुड इवनिंग’ असे शब्द आता वापरले जाणार नाहीयेत. त्याऐवजी शाळांमधील मुले आता ‘जय हिंद’ म्हणणार आहेत. १५ ऑगस्टपासून हा नवा उपक्रम लागू करण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबतचे आदेशही जारी केले आहेत. शिक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अभिवादन म्हणून ‘जय हिंद’ची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ही माहिती सर्व शाळांना पाठवली जात आहे. जेणेकरुन शालेय स्तरावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यापूर्वी त्याचे पालन सुनिश्चित करता येईल. ‘जय हिंद’चा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता आणि लोकप्रिय केला. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या चळवळीत त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. स्वातंत्र्यानंतर भारतीय सशस्त्र दलाने अभिवादन म्हणून ‘जय हिंद’ स्वीकारले. जे राष्ट्राच्या ‘सार्वभौमत्व’ आणि ‘सुरक्षेप्रती’ त्यांची सतत वचनबद्धता दर्शवते.

हे ही वाचा..

मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरूवात !

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा !

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १४ लाख खातेदारांना ५२१६ कोटींचे वाटप

१५ ऑगस्टपासून सुरू होणार उपक्रम
राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने ‘गुड मॉर्निंग’च्या जागी ‘जय हिंद’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने आणि आपल्या देशाच्या समृद्ध इतिहासाचा आदर करून विद्यार्थ्यांना दररोज प्रेरित करणे हा त्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची तीव्र भावना जागृत होईल. त्यानुसार आता हरियाणातील शाळांतील मुले गुड मॉर्निंगऐवजी जय हिंद म्हणतील. हा उपक्रम राज्यातील शाळांमध्ये १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसे सर्व शाळांना आदेश पाठवण्यात आले असून १५ ऑगस्टपासून या आदेशांची पूर्ण अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा