रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

भारताचा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या नेमबाजी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पाटील यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत चॅम्पियन ठरला असून, दिग्गज नेमबाजपटू अभिनव बिंद्रा नंतर कामगिरी करणारा रुद्राक्ष पाटील हा दुसरा भारतीय नेमबाज ठरला आहे. या विजयासह पाटील यांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले आहे. तसेच भारतासाठी १२ वर्षानंतर मिळालेले सुवर्ण पदक आहे.

ठाण्यात राहणाऱ्या १८ वर्षीय रुद्राक्ष पाटीलने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा १७-१३ असा पराभव केला. एका क्षणी तो अंतिम सामन्यात पिछाडीवर होता, पण नंतर त्याने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिकसाठी चार कोटा उपलब्ध आहेत. भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या सापळ्यातील पहिला कोटा भौनीश मेंदिरट्टाद्वारे मिळवला.

हे ही वाचा

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

रुद्राक्ष प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी झाले आहे. सामन्यात एका वेळी तो ४-१० ने पिछाडीवर होता. फायनलमध्ये बहुतेक वेळा इटालियन नेमबाजाने आघाडी घेतली होती, पण शेवटी रुद्राक्षने जोरदार पुनरागमन केले आणि विजेतेपद मिळवले. रुद्राक्षने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते आणि क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहून ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने २००६ मध्ये क्रोएशियातील झाग्रेब येथे १० मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विजेतेपदाचे सुवर्णपदक जिंकले होते.

Exit mobile version