भारतीय सैन्याच्या मराठी लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक) येथे दंगल अर्थात कुस्ती करणाऱ्या मुलांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या सेंटरतर्फे कुस्ती या खेळात प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलांकडून प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर क्रीडा कॅडेट्ससाठी या प्रवेशिका मागवल्या जात आहेत. यासाठी २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या ४ दिवसांच्या कालावधीत रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक) येथे निवडप्रक्रिया होणार आहे.
या निवडीसाठी पात्रता निकष हे खालील प्रमाणे आहेत.
वय: १ सप्टेंबर २०२१ रोजी वय ८-१४ या दरम्यान असावे. (१ सप्टेंबर २००७ ते ३० ऑगस्ट २०१३ दरम्यान उमेदवाराचा जन्म झाला असल्यास).
शिक्षण: किमान चौथी इयत्ता पास तसेच इंग्रजी आणि हिन्दी भाषांचे ज्ञान.
शारीरिक तंदुरुस्ती: मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तसेच आर्मी स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरच्या तज्ञांमार्फत उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
उमेदवाराने आपले आधीचे पदक आणि कुस्तीस्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरावर सादर करावे.
उमेदवाराच्या शरीरावर कुठेही टेटू असल्यास त्याची निवड केली जाणार नाही.
हे ही वाचा:
एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी
प्रकाश गंगाधरे यांच्या पुढाकाराने मुलुंडमध्ये दोन नव्या वातानुकूलित बस
गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या
भारतीय क्रीडा प्राधिकरण- साई, क्रीडा वैद्यकीय केंद्र आणि बॉइज कंपनी मार्फत ही निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या कुस्तीपटूंना या निवडप्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना इंग्रजी/हिन्दी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय, ‘साई’ मार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय दहावी नंतरही त्यांना विशेष निवड चाचणी आणि प्रशिक्षणातून जावे लागेल.
निवड झालेल्या मुलांना, निवड झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक) मध्ये रुजू व्हावे लागेल. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना मास्क आणि हातमोजे तसेच आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे.
संरक्षण मंत्रालयातर्फे या बद्दलचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांना इतर तांत्रिक माहिती सविस्तर वाचता येईल.