मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !

कस्टम विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर १३.२४ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी असल्याची माहिती आहे.

९ कोटी किमतीच्या सोन्यासह कस्टम विभागाने १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रिक उपकरणे सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय ४५ लाख रुपयांचे परदेशी चलन देखील हस्तगत करण्यात आले आहे. कस्टम विभागाची मुंबई विमानतळावर ही मोठी कारवाई केल्याची मानली जात आहे.

या प्रकरणी सात प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण २४ प्रकरणांमध्ये ही कारवाई केल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जप्त करण्यात आलेले सोने, इलेक्ट्रिक उपकरणे आणि परदेशी चलन हे कोठून आणले, याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता. याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

हे ही वाचा:

अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?

महायुती सरकारची नवी योजना; विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १० हजार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक

चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

 

Exit mobile version