लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया

लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया

भारतीयांसाठी सोने खरेदी ही कायमच एक जिव्हाळ्याची खरेदी मानली जाते. फार पूर्वीपासून किमान थोडे का होईना सोने घेण्याची प्रथा आपण आपल्या घरातही पाहिलेली आहे. मुहूर्ताचे निमित्त का होईना, सोने खरेदी हा भारतीयांचा आवडता विषय आहे. मुख्य म्हणजे आपल्याकडे सोने खरेदीही भावनिक असते हेही तितकेच खरे आहे. सध्याच्या घडीला सोन्याचे भाव चढे आहेत.

सोन्याने येत्या काळात लाखांची मजल मारली तर आश्चर्य वाटता कामा नये. आता श्रावणानंतर आपल्याकडे सण समारंभांना उधाण येईल. गेल्या चार महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर व्यवसायही पूर्वपदावर येत असताना सोने-चांदी भाव वाढू लागले आहेत. गेल्या १५ दिवसांतील तुलनात्मक दर बघता या काळात सोन्याचा भाव पाच ते सहा हजारांनी वधारला.

दुसरीकडे चांदीची दरवाढ सुसाट सुरू झाली आहे. चांदीने गेल्या २४ तासांत साडेतीन-चार हजारांनी उसळी घेतली. चांदी जाणार लाखावर अशी चिन्हे दिसत आहेत. सोन्याचा सध्याचा दर ४७ ते ४८ हजारांदरम्यान आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत हे दर ५२ हजार इतके होतील अशी शक्यता आहे. चांदीचा भाव गेल्या १५ दिवसांत तब्बल २१ हजारांनी वाढला आहे.

हे ही वाचा:

आयसीएमआर म्हणते कोरोनावर हे मिश्रण उपयुक्त

भंडाऱ्या पाठोपाठ आणखी एक जिल्हा कोरोनामुक्तीकडे

अरे बापरे!! खड्ड्यांमुळे रोज जातात एवढे बळी

दिल्लीतील हज हाऊसला स्थानिकांचा विरोध

येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता असून, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदी व आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ ही यामागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. ऐन कोरोनाकाळातही सोन्याचे भाव पडले नव्हते. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेतही भारतीयांच्या सोनप्रेमाची कल्पना आहे. मुख्य म्हणजे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यावर दर वाढणार हे निश्चितच आहे.

Exit mobile version