बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कारवाई

बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!

आयकर विभागाकडून बेंगळुरूमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.आयकर विभागाने गेल्या दोन दिवसांत बेंगळुरूमधील १६ ठिकाणी छापे टाकून मोठी रोकड आणि सोने जप्त केले आहेत. उद्योजक आणि सोन्याचे व्यापारी यांच्या जागेवर छापे टाकून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एकूण १ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.याशिवाय २२ किलो आणि ९२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, हिरे आणि बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व उघडकीस आले आहे.

हे ही वाचा:

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही

“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”

शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू

नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!

बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शंकरपूर येथून ३ कोटींहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.सारादेवी रोड येथून ३ कोटी ३९ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.बंगळुरू दक्षिण मतदारसंघातील मर्कंटाइल बँकेतून २ कोटी १३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

जयनगर थ्री ब्लॉकमधून ५ कोटी ३३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.बंगळुरू दक्षिण बसवानगुडी येथील पोस्ट ऑफिसमधून ३ लाख ३४ हजार किमतीचा ६.३८ कॅरेटचा हिरा जप्त करण्यात आला आहे.माता शारदा देवी रोड येथून ३ लाख १४ हजार किंमतीचा ५.९९ कॅरेटचा हिरा सापडला आहे.तसेच ६ कोटी ४० लाख रुपये किमतीचा २०२.८३ कॅरेटचा हिरा जयनगरमधून जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, आयकर विभागाने उद्योजक आणि सोन्याचे व्यापारी यांच्या जागेवर हे सर्व छापे टाकून ही मालमत्ता जप्त केली आहे.

Exit mobile version