इस्रायल आणि इराणच्या युद्धाचे पडसाद आता हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतही ऐकू येत आहेत. भाजपचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज (३ ऑक्टोबर) हरियाणामधील पलवलमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाच्या हत्येचा उल्लेख केला. यासोबतच इस्रायलला अधिक बळ मिळावे, यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली. हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार स्थापन झाल्यास पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला जाईल, असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, देशाच्या काना-कोपऱ्यातून घुसखोरांना बाहेर काढून टाकायचे आहे. काँग्रेसने संपूर्ण भारतात तुष्टीकरणाचे वातावरण निर्माण केले आहे. मिया आणि मुस्लिमांना आपल्या ठिकाणी कसे घेवून जाता येईल, हे एकच काम काँग्रेस करते. भारतामध्ये काँग्रेसचे सरकार नसते तर ७५ वर्षांपूर्वीच अयोध्येत राम मंदिर बनले असते.
हे ही वाचा :
राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान ड्रग्ज विकते
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या फाऊंडेशन विरोधात अहवाल मागवणाऱ्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
सावरकरांचा अपमान करण्याची राहुल गांधींची परंपरा काँग्रेस नेते पुढे नेतायात
‘सफरान’ भारतात पहिले इलेक्ट्रॉनिक्स युनिट स्थापन करणार
ते पुढे म्हणाले, काँग्रेसने बाबरचे पालन पोषण केले होते, आता बाबरची जागा प्रभू रामांनी घेतली. परंतु देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर लपले आहेत, यांना देशातून धक्के मारून बाहेर काढायचे आहे. यासाठी भाजपला पुन्हा-पुन्हा निवडणूक द्यायचे आहे.
इस्रायल नसरल्लाला मारले तेव्हा इंडी आघाडी रडत होती. सीमेवर जवान हुतात्मा झाल्यावर हे लोक रडतात का?, असा सवाल सरमा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, हिजबुल्लाचा प्रमुख मारतो तेव्हा ते रडतात, दहशतवाद संपला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, दहशतवाद संपवण्यासाठी देव इस्रायलला आणखी शक्ती देवो. ते पुढे म्हणाले, देव इस्रायलला आणखी शक्ती देवो जेणेकरून देशातील आणि परदेशातील सर्व नसराल्लाचा नाश होवो.